सावंतवाडी दि.१५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदार यांच्यासाठी सभा येत्या दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सभागृह सालईवाडा येथे आयोजित करण्यात आली आहे.
मुंबईच्या गिरणी कामगारांना गिरणींच्या जमीनीवर घर मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने विकास नियमावली क्र. ५८ लागू केलेला आहे. या कायदयाप्रमाणे साधारणपणे १८ हजार कामगारांना सोडतीच्या माध्यमातून म्हाडामार्फत घरे मिळाली आहेत. १ लाख ५१ हजार कामगारांनी ०१ जानेवारी १९९२ सालानंतरची गिरणीतील कागदपत्रे म्हाडाकडे पाठवून आपली घर मिळण्याबाबतची पात्रता सिध्द केलेली आहे. सदर घर मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने कालबध्द कार्यक्रम जाहीर करून लवकरात लवकर गिरणी कामगारांना घरे मिळावी पाहिजेत, अशी आमची शासनाकडे मागणी आहे. महाराष्ट्रातील गिरणी कामगार आपल्या गावी गेल्यामुळे विखुरलेले आहे. त्यांना एकत्र करून घर मिळण्याबाबत माहिती देवून पुढील अधिवेशनावर प्रचंड मोर्चा आणि आंदोलन करण्याचा कार्यक्रम राष्ट्रीय मील मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार श्री. सचिन आहिर आणि सरचिटणीस श्री. गोविंदराव मोहिते यांनी कामगार संघटनेच्या कृती समितीच्या बैठकीत जाहीर केलेले आहे.
याबाबत गिरणी कामगारांच्या सभा व बैठका घेण्याबाबत आयोजन केले जात आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हयातील गिरणी कामगारांची सभा बुधवार दि. २१ फेब्रुवारी राजी सकाळी १० वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा, जुनी पंचायत समिती जवळ, सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित केलेली आहे. या सभेमध्ये संघाचे उपाध्यक्ष श्री. रघुनाथ शिर्सेकर (अण्णा) आणि श्री. सुनिल बोरकर गिरणी कामगारांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी गिरणी कामगारांना व वारसांना मार्गदर्शन करणार आहे. तरी गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत एकजूट दाखवून घर पदरात पाडून घेण्याबात सर्वांनी एकत्र येवून सभा यशस्वी करावी असे पत्र गिरणी कामगारा कृती समितीने जाहिर केले आहे.
गिरणी कामगार मागण्या : वी डी डी चाळ, धारावी पुनर्वसनातील घरे तसेच एन टी सी गिरण्यांच्या रिक्त जमिनी, मिठागरातील जमीनी गिरणी कामगारांना घर बांधणीसाठी मिळाव्यात. सरकारच्या मालकीची मुंबई शहराच्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आदि ठिकाणची ११० एकरची जमीन जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार व शासनाच्या सहमतीने देवू केलेली जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी उपलब्ध करून दयाव्यात. संक्रमण शिबीरातील घरे गिरणी कामगारांना देण्यात यावीत. एन टी सी च्या बंद पडलेल्या गिरण्यांच्या अतिरिक्त जमीनी गिरणी कामगारांची घरे बांधण्यासाठी देण्यात याव्यात.
सरकारी योजनेतील जेथे शक्य असतील तेथे घरे गिरणी कामगारांना देण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.
या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग गिरणी कामगार जिल्हाध्यक्ष – श्री. शामसुंदर बाबु कुंभार,उपाध्यक्ष श्री. अभिमन्यू लोंढे,सेक्रेटरी – श्री. लॉरेन्स डिसोजा, श्री. राजेंद्र पडते,खजिनदार श्री. घनःश्याम शेटकर,
सावंतवाडी तालुकाध्यक्ष वेंगुर्ला श्री. रामचंद्र कोठावळे, श्री. सुभाष परब श्री. मदन पांडुरंग नारोजी, बागायतकार डिचोलकर, श्री. अशोक केरकर,दोडामार्ग – श्री. विश्वनाथ कुबल, रेखा लोंढे, मोहिनी रेडकर, नारायण गवस, आनंद राऊळ, नंदकिशोर वेंगुर्लेकर, माधवी मोरजकर, भालचंद्र सावंत,मालवण नासवीणेकर सौ. रजनी तेली, विनायक हरी लिमये, बाबल बाळकृष्ण हिर्लेकर, रामचंद्र केशव,कुडाळ संजय कदम, महादेव यशवंत सावंत, दिलीप सावंत, संतोष दिगंबर पालव यांनी केले आहे.