Site icon Kokandarshan

सावंतवाडीत चित्रीकरणासाठी “संभ्रम” वेबसिरीजची टिम दाखल…

माजी नगराध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा; कोकणातील संस्कृती परंपरा दाखविणार,.. सागर गोसावी…

सावंतवाडी,ता.२४: कोकणातील गावर्‍हाठी संस्कृती आणि परंपरा याची माहिती देण्याबरोबरच “लव्ह स्टोरी” आणि “हत्याकांड” अशा थरारक प्रसंगाचा मिलाप असलेले “संभ्रम” ही वेबसिरीज सावंतवाडीत चित्रीत केली जात आहे. या वेबसिरीजच्या टिमने आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेतली. यापुर्वी या टिमने “सांग ना रे मना” हे गित या ठिकाणी चित्रीत केले होते. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर कोकणातील संस्कृती व परपंरा दाखविण्याबरोबर प्रेम आणि हत्याकांडाची पार्श्वभूमीवर या मालिकेतून लोकांना दाखविण्यात येणार आहे, असे या मालिकेेचे निर्माता आणि कारिवडे गावचे सुपुत्र सागर गोसावी यांनी सांगितले.
कोकणात राहणाऱ्या एका सर्व सामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या असामान्य गोष्टीमुळे त्याच्या आयुष्यातील
प्रेम, भावा-बहिणीच नातं, त्याची मैत्री या सर्व गोष्टीमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण होतो.
संभ्रम ही रहस्य मय कथा असून, प्रेक्षकांच्या मनात भ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे. यामध्ये एक सुंदर प्रेमगीत असून या सीरिजमध्ये मुख्य कलाकार, सुहास रुके, गायत्री शिंदे, मधुरा पारदुले, राम पवार, राम निपाणीकर, तन्वी वेंगुर्लेकर, कुणाल वारुडे, आकाश शिंदे, कस्तुरी कोळी, तानाजी, राम साबळे, संकेत गोसावी, पूजा खरात, रावते या सर्वांनी काम केले आहे. लवकरच ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याबाबतची माहिती श्री. गोसावी यांनी दिली आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version