Site icon Kokandarshan

प्रा.राजाराम परब यांना कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचा ‘शैक्षणिक शिल्पकार’ पुरस्कार प्रदान..!

सावंतवाडी,दि.११: कोकणातील नीट, जेईई अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक अकॅडेमी म्हणून नावलौकिक असलेल्या परफेक्ट अकॅडेमीचे संचालक प्रा. राजाराम महादेव परब यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वतीने ‘शैक्षणिक शिल्पकार’ पुरस्कार सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सिताराम गावडे, सौ. संयुक्ता गावडे, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, डॉ. दत्तात्रय सावंत, श्रीमती स्वार, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, माडखोलचे माजी सरपंच संजय लाड, चौकुळ गावाचे सामाजिक कार्यकर्ते व यशस्वी उद्योजक दिनेश गावडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्य संपादक सिताराम गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विशाल पित्रे यांनी केले.

Exit mobile version