Site icon Kokandarshan

शिवशंभू प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची नियुक्ती

सावंतवाडी,दि.०६: ‘माझा सिंधुदुर्ग’ चॅनेलचे संपादक व सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक जय भोसले यांची शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान जाधव यांनी नुकतेच जय भोसले यांना नियुक्ती बाबतचे पत्र दिले असून सामाजिक, शैक्षणिक व अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शिवशंभू प्रतिष्ठान या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले आहे.

दरम्यान, जय भोसले यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version