Site icon Kokandarshan

श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा उत्सव गुरुवारी उत्साहात साजरा

सावंतवाडी,दि.०२: सावंतवाडी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा उत्सव गुरुवारी उत्साहात साजरा झाला. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील दर्शन घेतले. दरम्यान सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्सव म्हणून साजरा होतो.

सावंतवाडी -आंबोली रस्त्याच्या बाजूला असलेले हे देवस्थान जागृत आहे. या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारक या देवतेला नतमस्तक होऊनच पुढे रवाना होतो. महाराष्ट्र राज्यसह कर्नाटक, गोवा, राज्यातून दरवर्षी उत्सवाला भाविक सावंतवाडी दाखल होतात.

यावर्षीही उत्सवासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. तर देवस्थानकडून सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी देवावर अभिषेक व पूजा उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील भाविकानी तसेच जिल्हा बाहेरील भाविकांची दर्शन घेण्यासाठी व नवस, बोलणे व फेडण्यासाठी गर्दी दिसत होती.

Exit mobile version