Site icon Kokandarshan

सकल मराठा समाजाच्या लढ्यासाठी सावंतवाडी संस्थान पूर्ण सहकार्य करणार..!

राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी थोपटली सीताराम गावडे यांची पाठ..!

सावंतवाडी,दि.०१: येथील सकल मराठा समाजाचे झुंजार नेते सीताराम गावडे यांची नुकतीच सकल मराठा समाजाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल आज सावंतवाडी संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सावंतवाडी संस्थानाचे राजे श्रीमंत खेमसावंत भोंसले, राणी सरकार सौ. शुभदादेवी भोसले युवा नेते तथा युवराज लखमराजे भोसले यांनी सीताराम गावडे यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील लढ्यासाठी सावंतवाडी संस्थानच्या वतीने संपूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन देत सीताराम गावडे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. यावेळी सिंधुदुर्ग मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सदासेन सावंत,ज्येष्ठ मार्गदर्शक काका मांजरेकर उपस्थित होते.
दरम्यान यावेळी सकल मराठा समाजाचे राज्याचे नेतृत्व करत असलेले लढवय्ये नेते मनोज जरांगे – पाटील यांचा सिंधुदुर्गात जाहीर सत्कार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

सत्कारास उत्तर देताना सावंतवाडी संस्थानाच्या या भरभक्कम पाठिंबामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली असून तळागाळातील समाज बांधवांसाठी जीवाचं रान करून आपण काम करत राहू, अशी ग्वाही यावेळी श्री. गावडे यांनी दिली.

Exit mobile version