Site icon Kokandarshan

जिल्हा वीज संघटनेच्या २६ जानेवारीच्या लाक्षणिक उपोषणात दोडामार्ग वीज-ग्राहक संघटना सहभागी होणार

वीज ग्राहक संघटना बैठकीत निर्णय

दोडामार्ग,दि.२५ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या सर्वानुमते कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नव्याने स्थापन केलेल्या दोडामार्ग तालुका वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत अध्यक्ष सुभाष लक्ष्मण दळवी,सचिव दशरथ विठ्ठल मोरजकर, सहसचिव भूषण सुधाकर सावंत, उपाध्यक्ष संजय कृष्णा गवस, तालुका समन्वयक सागर शिरसाट, रूपेश मयेकर, पांडुरंग बोर्डेकर, श्रवणकुमार पुरोहित,नवराज कांबळे, रविंद्र खडपकर, मदन राणे, सल्लागार लक्ष्मण कुसो आयनोडकर व विजय लाडू जाधव,विष्णू मुंज उपस्थित होते.
सोनचाफा हाॅटेल दोडामार्ग येथे तालुका वीज ग्राहक संघटना बैठक संपन्न झाली. यावेळी पार पडलेल्या बैठकीत जिल्हा वीज संघटनेच्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या लाक्षणिक उपोषणात सहभागी होण्याचे सर्वानुमते ठरले.

Exit mobile version