Site icon Kokandarshan

असनिये येथील गावविकास युवा पॅनल च्या सौ.रेश्मा सावंत सरपंच पदी विराजमान

जवळपास तीस वर्षांनी सत्तेचा कायापालट.. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सावंत यांची माहिती

सावंतवाडी,दि.२१: तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी असनिये गावच्या ग्रामपंचायतवर गाव विकास युवा पॅनल ने विजय मिळवून सुमारे ३० वर्षा नंतर सत्तेचा कायापालट झाला असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सावंत आणि विलास सावंत यांनी म्हटले आहे.

गावविकास युवा पॅनलच्या सौ रेश्मा रमेश सावंत यांच्या विरोधात भाजपच्या सुजाता महादेव सावंत निवडणुकीत रिंगणात होत्या. सौ रेश्मा सावंत यांनी ३६१ एवढे मताधिक्य मिळवत जवळपास १४८ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

गावविकास युवा पॅनल कडून दोन बिनविरोध सदस्य तर दोन निवडणूक लढवत सदस्य निवडून आले असल्याची माहिती श्री जितेंद्र सावंत यांनी दिली.

गावविकास युवा पॅनल कडून निवडून आलेल्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ.रेश्मा सावंत आणि सदस्य यांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Exit mobile version