Site icon Kokandarshan

सावंतवाडी येथील रोजगार मेळाव्यास युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

विशाल परब यांनी केलेल्या आयोजनाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

सावंतवाडी,दि.१२: भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून आज सावंतवाडी जिमखाना मैदान परिसरात आयोजित रोजगार मेळाव्याला युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
येथे सुरू असलेल्या रोजगार मिळविण्यासाठी आपला अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली आहे.
या मेळाव्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान बोलताना पालकमंत्री यांनी विशाल परब यांनी केलेल्या रोजगार मेळाव्याच्या नियोजनबद्ध आयोजनाचे कौतुक केले.
यावेळी माजी आमदार राजन तेली, युवराज लखमराजे भोसले,माजी नगराध्यक्ष संजू परब,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत,प्रथमेश तेली, जावेद खतीब, अजय गोंदावळे,आनंद नेवगी,रवी मडगावकर, विकास परब,तेजस माने, प्रशांत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version