Site icon Kokandarshan

शिवसेना ही शिंदेंचीच हा महत्त्वपूर्ण निर्णय : सावंतवाडीत पेढे भरवून जल्लोष साजरा

सावंतवाडी,दि.१०: शिवसेना शिंदेंचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर सावंतवाडीतील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी फटाके वाजवून या एकमेकांना पेढे भरविण्यात आले.
दरम्यान “शिवसेना जिंदाबाद..!!”, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो…!!” “दीपकभाई केसरकर आगे बढो…!!” या घोषणा देण्यात आल्या. सावंतवाडी येथे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला शहर प्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, दत्ता सावंत, आबा केसरकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, नंदू गावडे, श्री बांदेकर, सदा कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version