Site icon Kokandarshan

ओटवणे ग्रामपंचायत इमारतीचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी,दि.०७: जागृत देवस्थानासह संस्थानकालीन गौरवशाही ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच राजकारणाच्या पलीकडे जाऊन पुरेसा निधी देऊन या गावचा सर्वांगिण विकास साधला जाईल. अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ओटवणेवासियांना दिली.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून साकारलेल्या ओटवणे ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री रविंद्र चव्हाण व दीपक केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष नारायण ऊर्फ बबन राणे, काँग्रेस नेते विकास सावंत, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, गटविकास अधिकारी व्ही एम नाईक, माजी सरपंच सौ उत्कर्षा गावकर, रवींद्र म्हापसेकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर, ग्रामपंचायत सदस्य समीक्षा गावकर, महेश चव्हाण, महेश परब, प्रशांत बुराण, मनाली गावकर, संजना जाधव, लावण्या तावडे, अस्मिता भगत, शिवसेना विभाग प्रमुख उमेश गावकर, तंटामुक्ती अध्यक्ष सगुण गावकर, तलाठी यु व्ही सोनवलकर, ग्रामसेवक आरती चव्हाण, ग्रामसेवक अमित राऊळ, गुंडू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी या गावाशी आपले भावनिक नाते आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी भरघोस निधी दिला जाईल अशी ग्वाही देत आपणाला केव्हाही हक्काने हाक मारा आपण तत्पर असल्याचा ओटवणेवासियांना शब्द दिला. तर दीपक केसरकर यांनी ओटवणे गावाशी असलेल्या अतूट नात्यातून या गावाच्या विकासासाठी आपण पूर्वीच कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच या गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असुन या नूतन ग्रामपंचायतीच्या सभोवताली पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी निधी देण्याची ग्वाही दिली.
यावेळी कविवर्य कृष्णा देवळी यांच्या देवस्थानावरील काव्य व आरती लेखनाबद्दल त्यांचा रवींद्र चव्हाण आणि दीपक केसरकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र म्हापसेकर यांनी सुत्रसंचालन शिक्षक एन व्ही राऊळ तर आभार महेश चव्हाण यांनी मानले.

Exit mobile version