सावंतवाडीत सिंधुदुर्ग प्रेस क्लबकडून पत्रकार दिन उत्साहात साजरा
सावंतवाडी,दि.०६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत आहे.पत्रकारांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असून हा वसा असाच कायम ठेवावा येथील पत्रकार सर्व सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करतात असे गौरवोद्गार सावंतवाडीचे प्रांताधिकार प्रशांत पानवेकर यांनी काढले.
जिल्हाध्यक्ष अनंत जाधव,हेमंत खानोलकर अरूण वझे उपस्थित होते.
यावेळी पानवेकर म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारिता ही सर्वाना बरोबर घेऊन जाणारी आहे.असेच काम सर्वानी करावे असे आवाहन त्यांनी केले तसेच सावंतवाडीतील पत्रकार हे सर्व सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे स्पष्ट केले.
तर लखमसावंत यांनी सावंतवाडीतील पत्रकार हे राजकारणात नव्याने येणाऱ्यांना संधी देत असतात हे बघून बरे वाटते अशा शब्दात कौतुक केले.बबन साळगावकर यांनी तर आपण प्रेस क्लब च्या पहिल्या दिवसापासून सोबत आहे.ही सोबत अशीच कायम राहिल असे सांगितले त्यामुळेच सर्वानी नेहमी जनतेला अभिप्रेत काम करावे असे आवाहन केले.आपण सदैव तुमच्या सोबत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
अशोक दळवी यांनी येथील पत्रकारांना धन्यवाद देतना सर्वानी मिळून विकास कामात सहकार्य करता तसेच सहकार्य भविष्यात ही करावे आणि या जिल्ह्याला विकास कामात अग्रेसर राहुया असे आवाहन ही दळवी यांनी यावेळी केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, अर्चना घारे-परब,पत्रकार अभिमन्यू लोंढे, सिताराम गावडे यांनी ही आपले विचार मांडले तसेच पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.तसेच पत्रकार काय करू शकतो हे पटवून दिले.यावेळी प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष अनंत जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाला पत्रकार उमेश सावंत,राकेश परब,संजय भाईप,लक्ष्मण आढाव,संदेश पाटील,शैलेश मयेकर,आनंद धोंड,नयनेश गावडे,मदन मुरकर,संदिप राऊळ,मकरंद मेस्त्री,संजय पि॓ळणकर,संदेश कारिवडेकर विशाल सावंत आदी उपस्थित होते.