Site icon Kokandarshan

विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लवकरच कॉलेज संघटना स्थापन करणार.. केतन सावंत

सिंधुदुर्ग,दि.०४: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थी सेना युनिट्स स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थी मनसेकडे कसे येतील व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे मत विद्यार्थी सेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी स्पष्ट केले.

अनेक युवक व युवती मनसे विद्यार्थी सेनेमध्ये काम करण्यास तयार असून या सर्व विद्यार्थ्यांना संपर्क साधण्यासाठी लवकरच विद्यार्थी सेनेची तालुका निहाय कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version