कणकवली,दि.०४ : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविदयालयामध्ये जिमखाना विभागातर्फे वार्षिक क्रीडा महोत्सव सुरु झाला आहे. हा क्रीडा महोत्सव दिनांक २ ते ६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी महाविद्यालयातील यावर्षी वैयक्तिक क्रीडा स्पर्धा, कबड्डी, क्रिकेट,व्हॉलीबॉल ,कॅरम, बुद्धीबळ बॅडमिंटन आणि रस्सीखेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण गावडे यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे आणि जिमखाना विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले आहे.