सावतवाडी,दि.०४- सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाचे उपसचिव नि.भा. खेडकर यांच्या लेखी पत्रान्वये जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिपकभाई केसरकर यांचे विश्वासु कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे सावंतवाडी तालुक्यातील माजगांव येथील रहिवासी असून ते सिधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून पक्षाची जबाबदारी सांभाळत आहेत.
गेली अनेक वर्षे शासकीय यंत्रणेतील कामकाजाचा अनुभव असून ग्रामपंचयत ते जिल्हा परिषद/पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये धडाडीने काम केलेले आहे. त्यांनी सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती म्हणून उल्लेखनीय काम केलेले आहे. तसेच सामाजिक, सहकार, शिक्षण क्षेत्रातही भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या अनुभवाचा जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी निश्चितच फायदा होणार आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.