Site icon Kokandarshan

रोणापाल ग्रामपंचायत च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे गावच्या विकासासाठी भरघोस विकास निधी दिल्याबद्दल मानले आभार.. रोणापाल सरपंच योगिता केणी

सावंतवाडी, दि. ०२ : रोणापाल गावातील रस्त्यांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून व माजी आमदार राजन तेली यांच्या प्रयत्नातून खेरकटवाडी भरडवाडी रस्त्यासाठी जिल्हा नियोजन २२ – २३ मधून ५ लाख व २३ – २४ मधून ५ लाख, डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत ३ लाख असा एकुण १३ लाख रोणापाल ख्रिश्चन वाडी येथील रस्त्यासाठी जिल्हा नियोजन २३ – २४ मधून ६.५ लाख व ख्रिश्चनवाडी येथे थ्री फेज लाईन टाकणे यासाठी १ लाख असा एकूण २०.५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सरपंच सौ. योगिता योगेश केणी यांनी दिली. यासाठी ग्रामपंचायत सदस्य योगेश केणी, माजी सरपंच ऊदय देऊलकर, माजी सरपंच सुरेश गावडे यांनी पाठपुरावा केला होता.

Exit mobile version