Site icon Kokandarshan

शिरशिंगे गावाची ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या १ जानेवारी रोजी…

सावंतवाडी,दि.३१: तालुक्यातील शिरशिंगे गावाची ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या दिनांक ०१ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.
या निमित्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम,ओटी भरणे, नवस बोलणे,नवस फेडणे,रात्री पालखी उत्सव,रात्री उशिरा आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.

तरी जत्रोत्सवास माहेरवाशीनी,आणि भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गावातील मानकरी, ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version