शिरशिंगे येथील भाजप पुरस्कृत पॅनलच्या प्रचार रॅलीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी,दि.१५ : तालुक्यातील शिरशिंगे येथील ग्रामपंचायत निवडणूक भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठितेची मानली जात आहे.
भाजप पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार श्री दिपक राऊळ आणि सदस्यपदाच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली असून श्री दिपक राऊळ आणि त्यांच्या पॅनलला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील सरपंच पदासाठी उमेदवार असलेल्या श्री दिपक राऊळ यांनी, मी सैनिकात राहून देश सेवा केली आता मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून समाजसेवा करेन आणि आपल्या सोबत असलेली युवा पिढी आणि गावातील जाणती राजकीय अनुभवी मंडळी यांच्या साथीने आपण विजय संपादन करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारचे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी सरपंच पदाचे उमेदवार श्री दिपक राऊळ, यांच्या समवेत प्रचार प्रमुख प्रशांत देसाई सदस्य पदाचे सर्व उमेदवार आणि गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.