सावंतवाडी,दि.२८: येथील जनरल जगन्नाथराव भोसले स्मुर्ती उद्यान नगरपरिषद सावंतवाडी मध्ये सुरू झालेल्या मिनी महोत्सवला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली होती. काल बुधवार २७ डिसेंबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत कणकवली, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, नांदगाव, दोडामार्ग शिरोडा, सावंतवाडी अशा विविध ठिकाणावरून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांनी रोमांचक रेकॉर्ड डान्स सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व दीपकभाई मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा मिनी महोत्सव आयोजित केला होता. आज दिनांक २८ डिसेंबर रोजी ओमकार कला मंच संपूर्ण सिंधुदुर्ग मध्ये गाजलेला विविध कलाकृतीने नटलेला सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी ठीक ७ वाजल्यापासून सादर होणार आहे. तसेच पुढे तीन दिवस विविध कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.