विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार…
सावंतवाडी, दि.२८ : येथील कोलगाव ग्रामपंचायत येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा सावंतवाडी तालुक्याचा समारोप समारंभ संपन्न झाला.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा गावातील सर्वसामान्य माणसाला मिळावा यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या योजनेचा लाभ व माहिती देण्यात आली. तसेच गावातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे भोसले, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कोलगाव विकास सोसायटीचे अध्यक्ष वीरेंद्र धुरी, कोलगाव विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष साबाजी धुरी, सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच श्री दिनेश सारंग, खरेदी विक्री संघाचे संचालक प्रभाकर राऊळ, ग्रामपंचायत सदस्य संदीप हळदणकर, रोहित नाईक, आत्माराम चव्हाण, रसिका करमळकर, संयोगिता उगवेकर, हेमांगी मेस्त्री, गौरी करमळकर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.