Site icon Kokandarshan

शारदा विद्यालय मळगाव रस्ता प्रशालेच्या गुणवंतांचा गौरव

अष्टविनायक कला क्रीडा मंडळ , मळगाव ( रस्तावाडी ) तर्फे आयोजन

सावंतवाडी, दि. २३ : बाल कला-क्रीडा महोत्सव २०२३ – २४ अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये शारदा विद्यालय मळगाव रस्ता या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी निरवडे केंद्र व आजगाव प्रभागात घवघवीत यश संपादन केले. कबड्डी मध्ये द्वितीय, खो-खो मध्ये प्रथम, लांब उडी – प्रथम, उंच उडी – द्वितीय, ५० मीटर धावणे – तृतीय, समूह नृत्य – प्रथम, खो खो (मुली) – प्रथम क्रमांक प्राप्त करत विद्यार्थ्यांनी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला‌. अष्टविनायक कला क्रीडा मंडळ, मळगाव ( रस्तावाडी ) च्या वतीने सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना तालुका स्तरावरील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गोपाळ नार्वेकर, गटविस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, अष्टविनायक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री. तुळशीदास नाईक, उपाध्यक्ष श्री. सिद्धेश तेंडोलकर, खजिनदार श्री. संदेश सोनुर्लेकर, सल्लागार श्री. राजा राऊळ, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा सुर्वे, आदि मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, क्रीडा प्रशिक्षक श्री. गजेंद्र गावडे, श्री. शेखर राऊळ, श्री.‌आनंद राणे, नृत्य प्रशिक्षक सिया शिरोडकर, सौ. सुप्रिया नाईक ( वेशभूषा ), श्री. गणेश मेस्त्री, श्री. सुनील राऊळ, श्री. गोपाळ नार्वेकर, श्री. सिद्धेश तेंडोलकर, सौ.सिद्धी तेंडोलकर, भिसे काकी व राऊळ काकी यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षणप्रेमी श्री. विजय ठाकूर, पालक व‌ सदस्या सौ. विशाली जाधव, श्री. प्रशांत लातये, श्री पंढरीनाथ गावकर, सौ. माधवी शिरोडकर, सौ. गौरवी मेस्त्री, सौ. सारिका परब, सौ. रंजना राऊळ, श्री. उत्तम मेस्त्री आदि उपस्थित होते.

दुर्वा साळगावकर, श्री. राजा राऊळ, श्री गोपाळ नार्वेकर, सीमा सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश चव्हाण, उदय फेंद्रे, प्रसाद लुमाजी, पांडुरंग नाटेकर, निलेश नाटेकर, प्रथमेश खडपकर, अथर्व धुरी, शेखर राऊळ, उमेश कोंडये, प्रसन्न सोनुर्लेकर, आर्यन लोके, सिद्धेश फेंद्रे, रामा देवळी, मनीष नाटेकर, ज्ञानेश्वर राणे, सचिन सोनुर्लेकर, शेखर राऊळ, सचिन नाईक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न सोनुर्लेकर यांनी केले. आभार निलेश चव्हाण यांनी मांडले.

Exit mobile version