सावंतवाडी,दि.२३: एप्रिल “मे” महिन्याच्या अखेर विहिरी नदी नाले यांची पाण्याची पातळी कमी होते, पर्यायी पाळीव प्राणी तसेच जंगलातील प्राणी यांना पाण्याच्या शोधात फिरावे लागते या उद्देशाने सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात “एक दिवस बंधाऱ्यासाठी” हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नदीवर प्रत्येक वाडीनुसार बंधारे बांधण्यात आले.