ग्रामस्थांकडून नाराजी.. प्रशासनाचा मात्र दुर्लक्ष
सावंतवाडी,दि.२२: शहरातील शिरोडा नाक्यावरील दर्शनी भागातील रस्त्याची खोदाई करण्यात आल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून सुंदरवाडी ची अवस्था गॅस पाईपलाईन खोदाई मुळे भकास वाडी बनली आहे.
यावर ना नगरपालिका प्रशासनाचा लक्ष ना राजकीय लोकप्रतिनिधींचा त्यामुळे गॅस खोदाई साठी करण्यात आलेले रस्ते पुन्हा उखडले जात असून रस्ता खोदाई पूर्वी नगरपरिषद कडून जे नियम घालून दिलेले आहेत ते सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत.
नगरपरिषद ने गॅस पाईपलाईन साठी काही अटी शर्तीनुसार परवानगी दिली आहे.मात्र गॅस पाईपलाईन साठी रस्ता खोदाई करणाऱ्या कंपनीने या सर्व अटी शर्थी धाब्यावर बसवून काम सुरू केले आहे.ज्या ठिकाणी रस्ता खोदाई केली तेथे पाणी मारणे बंधनकारक असताना अद्याप पर्यत पाणी मारले नाही.ज्या ठिकाणी रस्ता खोदाई करण्यात आला तेथील रस्ता रोलर ने सपाटीकरण करणे गरजेचे असतनाच मातीचे ढिगारे करून ठेवण्यात आले आहे त्याच बरोबर रस्ता खोदाई पूर्वी सुरक्षा फलक गरजेचे असतात ते फलक लावण्यात आले नाही.रस्ता खोदाई ही एका बाजूने करणे गरजेचे असतना रस्ता खोदाई ही सालईवाडा भागात मधोमध करण्यात आली आहे.