या बाबतबाबत निषेध करण्यासाठी शनिवार १७ डिसेंबर पासून मोती तलाव परिसरामध्ये राबविणार सह्यांची मोहीम.. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
सावंतवाडी, दि.१४ : शहरातील निसर्ग संपन्न मोती तलावाच्या संरक्षक भिंत बांधण्यास विलंब होत असून यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा दिसून येत आहे,सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही मोती तलावाच्या बांधकामाविषयी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्याच्या निषेध करण्यासाठी शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ पासून मोती तलाव परिसरामध्ये सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे कोणत्याही परिस्थितीत बांधकामाला सुरुवात करा याबाबत आम्ही ठाम असून हे काम सुरू केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही.
येत्या चार साडेचार महिन्यात पावसाच्या नवीन हंगामाला सुरुवात होणार आहे अत्यंत धोकादायक झालेली ही मोती तलावाचा काट आजच कमकुवत झाला आहे तातडीने हे काम करणे गरजेचे आहे तरी जाणीवपूर्वक हे कामाकडे दुर्लक्ष करत असून पुढील काळामध्ये दुर्घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी जबाबदार राहतील याची दखल या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा शब्दात माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे आपली नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलताना त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव ,राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरसेकर, उपाध्यक्ष दिलीप पवार, मनवेल फर्नांडिस, छावा संघटनेचे अध्यक्ष संतोष तळवणकर, कदम सर आदी मान्यवर उपस्थित होते.