Site icon Kokandarshan

राजवाडा परिसरातील धोकादायक झाडे तोडल्याने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने युवराज लखम राजांचे मानले आभार…

सावंतवाडी,दि.०५: शहरात तीन महिन्यापूर्वी राजवाडा येथील रस्त्यावर पावसामध्ये भले मोठे झाड पडून दोन तरुणांचा नाहक बळी गेला होता. या घटनेने सावंतवाडी शहर हादरून गेले होते व सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात आली होती. पुन्हा अशी घटना घडू नये याकरिता रस्त्यावर असलेल्या धोकादायक झाडांची दखल घेऊन युवराज लखम राजे यांनी सदर रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक झाडे तत्काळ तोडून घेतली आहेत. त्यामुळे आता या धोकादायक झाडांमुळे पुढे होणारा अनर्थ टळला आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व शहरातील नागरिक तसेच टेम्पो चालक मालक संघटनेने लखमराजांचे आभार मानले आहे.

Exit mobile version