Site icon Kokandarshan

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

सिंधुदुर्गनगरी,दि.२९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने ४ डिसेंबर रोजी राजकोट, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या निमित्ताने या सोहळ्याची माहिती देणारी माहिती पुस्तिका सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात करण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेचे आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी खासदार निलेश राणे आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी यासंदर्भातील समन्वय पुस्तिका, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्वांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

या माहिती पुस्तिकेत किल्ले राजकोट आराखडा, नौदल दिन सोहळा, कार्यक्रम प्रसिध्दी, नियंत्रण कक्ष व्यवस्थापन, तारकर्ली येथील कार्यक्रम स्थळाचा नकाशा, सोहळ्याचे संपूर्ण सनियंत्रण, हेलीपॅड व अनुषंगिक व्यवस्थापन, व्यासपीठ व मंडप्‍ व्यवस्थापन, पार्कींग व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्थापन, विद्युत पुरवठा अशा अनेक माहितींचा समावेश आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version