उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन
सावंतवाडी,दि.२६: रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल )येथे सभागृह बांधणे (१२ लाख रुपये )या कामाचे भूमिपूजन तालुका प्रमुख रुपेश राऊळ, सौ.ऋतुजा राऊळ यांच्या शुभहस्ते झाले.
मनोहर मयेकर, अस्मिता भगत, मनाली गावकर,समीक्षा गावकर,प्रकाश पनासे, संजय कविटकर, गुंडू जाधव, मंगेश चिले,कृष्णा देवळी,पुरोहित बंडया केळकर,सुनील मेस्त्री, आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

