सावंतवाडी,दि.२३: येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत सावंतवाडी ताब्यात घेणार, असा दावा आज येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले .
आताचे सरकार निवडणूका घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे प्रशासकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना जनता आणि विशेषतः शिवसैनिक नक्कीच जागा दाखवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. ठाकरे हे आज सावंतवाडीत आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना सावंतवाडीच्या जागेबाबत विचारले असता ते म्हणाले, या ठिकाणी सावंतवाडीची जागा आम्ही ताब्यात घेणार आहोत. त्या दृष्टीने आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. येथील तिन्ही विधानसभेसह लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.