Site icon Kokandarshan

कारिवडे येथील महिलेचा मगरीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

अचानक झालेल्या हल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण

सावंतवाडी दि.०९ : कपडे धुण्यासाठी कारिवडे येथील धरणावर गेलेल्या लक्ष्मी बाबली मेस्त्री (६०) या महिलेवर अचानक मगरीने हल्ला केल्याने त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी मेस्त्री या कपडे धुण्यासाठी गुरूवारी दुपारी कारिवडे धरण पात्रात गेल्या होत्या. त्या सायंकाळी उशिरापर्यंत घरी आल्या नाहीत म्हणून मेस्त्री कुटुंबीयांसह वाडीतील ग्रामस्थांनी शोधाशोध केली होती परंतु त्या भेटल्या नाही.

शुक्रवारी सकाळी कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांसह गुराख्यांनी धरणपात्राच्या पाण्यात मृतदेह तरंगत असल्याचा पाहिला. आणि याबाबत ची माहिती व न खात्याला व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
दरम्यान हल्ला मगरीने केला असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे.

Exit mobile version