सावंतवाडी दि.२२: चौकुळ येथील रहिवाशी तथा सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान जाधव यांचे आज बुधवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. उद्योजक तथा प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी आपल्या शेतीत केला. मात्र, मागील काही वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते.
काल सायंकाळी श्वसनाच्या त्रास जाणवू लागल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी गोवा जीएमसी येथे हलविण्यास कळविले. मात्र गोवा जीएमसी येथे पोहचण्यापूर्वी. श्री. जाधव यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्ञानसेवा अकादमीचे संचालक अभय जाधव व अद्विक बिझनेसचे मालक संजोग जाधव यांचे ते वडील होत.