शिरशिंगे कलंबिस्त पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
सावंतवाडी, दि.०९ : तालुक्यातील धवडकी ते शिरशिंगे ह्या रस्त्यावर खड्डे पडले असून हा रस्ता वाहतुकसाठी धोकादायक ठरत आहे.
गेले कित्येक दिवस याबाबात संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे मात्र अद्याप पर्यंत या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही.
संबंधित खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येत्या दोन दिवसात रस्त्यावर पडलेले खड्डे आणि साईट पट्ट्या दुरुस्ती कराव्यात अशा प्रकारचे निवेदन आज शिरशिंगे, कलंबिस्त, सांगेली येथील ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता सीमा गोवेकर यांना दिले आहे.
यावेळी गोवेकर यांनी आपण याबाबतचची माहिती कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याशी बोलून याबाबत तात्काळ कार्यवाही करू अशा प्रकारचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना ग्रामस्थ प्रशांत देसाई यांनी येत्या १२ आणि १३ डिसेंबर रोजी कलंबिस्त आणि शिरशिंगे गावची जत्रा असल्यामुळे या रस्त्यावरून वाहनांच्या रहदारीचे प्रमाण वाढणार आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रस्त्यावरील खड्डे आणि साईट पट्टी दुरुस्ती करावी अशी मागणी अशा प्रकारची मागणी केली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते, प्रशांत देसाई, शिरशिंगे माजी सरपंच बाबाजी धोंड,न्हानू राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.