Site icon Kokandarshan

दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव २८ नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी,दि.१६: सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्‍यातील सोनुर्ली येथील दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिध्द असलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून पुर्ण राज्यात नावलौकिक असलेल्या श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.

नवसाला पावणाऱ्या व दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव हा लोटांगणासाठी सिंधुदुर्गसह कोकणात तसेच महाराष्ट्र गोवा. तसेच अन्य अन्य राज्यात प्रसिद्ध आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या देवीच्या चरणी जत्रोत्सवानिमित्त अनेक भक्त लीन होतात. त्यामुळे या देवी माऊलीची महती दिवसेंदिवस वाढत आहे. अशा या देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव या २८ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. माऊली भक्तगण यांनी या जत्रोत्सवचां लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी मार्फत करण्यात आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version