कुडाळ, दि.१५ : हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कुडाळ येथील आनंदाश्रमातील निराधारांना दीपावलीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
दरम्यान रविवार दि. १२ नोव्हेंबर रोजी येथील निराधारांबरोबर हातभारच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी करत निराधारांचे तोंड गोड केले. यावेळी खाद्यपदार्थ, फराळ, जीवनावश्यक वस्तू, साड्या आदींचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पिळणकर, वेंगुर्ला तालुका प्रमुख प्रतीक खानोलकर, कल्पवृक्ष ऍकॅडमीच्या अध्यक्षा सौ. उर्मिला पेडणेकर, वेंगुर्ला पाटकर हायस्कुलच्या शिक्षिका सौ. समृद्धी पिळणकर आदी उपस्थित होते. तर यासाठी वेतोरे केंद्रप्रमुख नितीन कदम, संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर, सौ.शमिका नाईक आदींनी आर्थिक स्वरूपात सहकार्य केले.
यावेळी आनंदाश्रमचे संस्थापक अध्यक्ष संदीपकाका परब यांनी हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे आभार व्यक्त केले.