Site icon Kokandarshan

युवकांची फौज खेड्या – पाड्यातून निर्माण झाली पाहिजे..

दांडेली येथील जय हनुमान मित्र आयोजित “दीपावली” “शो” टाईमचे विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवडी,दि.१४ : येथील दांडेली सारख्या छोट्या गावातून आज दोन पोलीस निर्माण झाले.येथील मुले शासकीय नोकरीत लागली आणि त्यांचा सत्कार करण्याचा भाग्य मला लाभले.
मोठ व्हायचं असेल तर कर्तृत्व महत्त्वाचा आहे.
हा माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. युवकांची फौज खेड्या-पाड्यातून निर्माण झाली पाहिजे. यासाठी जे काय करायचं असेल ते करण्यासाठी माझी तयारी आहे.
दांडेली गावातील लोकांनी मला मदतीची केव्हाही हाक मारा.मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे,असे मत यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केले.

दांडेली येथील जय हनुमान मित्र दांडेली आरोस बाजार आयोजित दीपावली शो टाईम च्या उद्घाटन प्रसंगी श्री परब व्यासपीठावरून बोलत होते.
या दीपावली शो टाईमचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर योगेश नाईक,दांडेली गावचे जेष्ठ नागरिक पांगम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version