Site icon Kokandarshan

मी आमदारकीच लढवणार.. मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी,दि.११: मी आमदारकीच लढवणार मी खासदारकीसाठी इच्छुक नाही.त्यामुळे कोणी अफ़वा पसरवत असतील की केसरकर लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे,तर त्यावर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट करत खासदारकीच्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
आज आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
या मतदार संघातील काही विकासकामे अपूर्ण आहेत.ती पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा आमदारकी लढवणार आहे.या लोकसभा मतदार संघात महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचेही त्यांनी सांगत मी आमदारकी पुन्हा लढवणार असे स्पष्ट केल्याने आता केसरकर यांच्याबाबत लोकसभा निवडणूक लढवणार की नाहीत या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.

Exit mobile version