सावंतवाडी,दि.०९ : येथील शहर भाजपाच्या पदाधिकारी सौ.परिणीता वर्तक यांचा आज दुपारी निधन झाले. सौ.वर्तक यांनी शिवसेना पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून काम केले होते.
त्या सामाजिक कार्यात नेहमी सक्रीय असायच्या मात्र गेले काही दिवस ते आजारी होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती ,सासू ,दोन मुलगे,एक मुलगी असा परिवार आहे.