Site icon Kokandarshan

कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा

सावंतवाडी, दि.०६: कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने दिवाळी निमित्ताने यंदाही दरवर्षी प्रमाणे किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही किल्ले स्पर्धा खुला व बाल गट अशा दोन गटात होणार आहे. ह्या स्पर्धेत खुला गट साठी प्रथम क्रमांक बक्षीस रोख रक्कम ₹७०००/- व सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक बक्षीस रोख रक्कम ₹५०००/- व सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक बक्षीस रोख रक्कम ₹२०००/- व सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तर बाल गट साठी प्रथम क्रमांक बक्षीस रोख रक्कम ₹१५००/- व सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक बक्षीस रोख रक्कम ₹१०००/- व सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक बक्षीस रोख रक्कम ₹७५०/- व सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तसेच दोन्ही गटासाठी प्रत्येकी ५ उत्तेजनार्थ ठेवण्यात आले आहेत त्याच्यासाठी बक्षीस रोख रक्कम ₹५००/- व सहभागप्रमाणपत्र ठेवण्यात आले.खुल्या गटासाठी प्रवेश फी ₹५००, तर बाल गटासाठी ₹१०० असणार आहे.
आपली नाव नोंदणी व प्रवेश फी पाठवण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा :-9145159321 तसेच आपल्या किल्ल्याचे विडिओ पाठवण्यासाठी पुढील क्रमांकावर व्हाट्सअँप द्वारे विडिओ पाठवावे :-9405475712, दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत आपली नाव नोंदणी kravतरीही जास्तीत जास्त स्पर्धेकानी ह्या मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने करण्यात येत आहे.
*टीप :* दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत आपली नाव नोंदणी करावी

*अटी व नियम :-*
१)किल्ला बनवताना सुरवातीचा व्हिडिओ पाठवणे गरजेचे तसेच किल्ला पूर्ण झाल्यावरचा व्हिडिओ पाठवणे गरजेचे आहे.
२)एकत्र समुहाने(ग्रुपने )किल्ला बनवणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल तसेच सर्व समुहाने(ग्रुपने)किल्ला बनवलेला व्हिडिओ पाठवणे गरजेचे आहे.
३)प्रवेश फी भरलेल्या स्पर्धकच स्पर्धेसाठी गृहीत धरला जाणार
४)किल्ले स्पर्धेसाठी परीक्षण १० गुणांमध्ये केले जाणार आहे त्यातील ४ गुण हे जास्तीत जास्त लाईक व व्हिवर्स ह्या साठी असणार तर ६ गुण हे किल्ले बांधणी साठी असणार आहेत.
५)किल्ले स्पर्धेचा व्हिडिओ हा आडवा म्हणजे (Landsacpe) शूट केलेला असावा कोणताही रील किंवा एडिट केलेला व्हिडिओ स्पर्धेसाठी घेतला जाणार नाही.

Exit mobile version