सावंतवाडी ०७: निवडणुकीचा कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक १८ डिसेंबरला होत असून निवडणुकीचा पार्श्वभूमीवर गावातील पार्श्वभूमी माहिती घेण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्रीम. रोहिणी सोळुंखे व बांदा पोलीस निरीक्षक श्री शामराव काळे यांनी भेट दिली निगुडे ग्रामसेविका श्री. तन्वी गवस यांनी डॉ. सोळुंके यांचे शाल श्रीफळ देऊन ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरूदास गवंडे, तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, पोलीस पाटील सुचिता मयेकर, माजी सरपंच आत्माराम गावडे, आरोग्य सेवक नीलकंठ बांधवलकर, ग्रामपंचायत कर्मचारी लवु जाधव, संतोष राणे, परेश गावडे उपस्थित होते यावेळी डॉ. श्रीमती सोळुंखे यांनी किती उमेदवार सरपंच पदासाठी, ग्रामपंचायत सदस्य साठी रिंगणात आहे याची माहिती घेतली तसेच कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करा बांदा पोलीस निरीक्षक श्री शामराव काळे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये सरपंच उपसरपंच यांनी गावात चांगलं सहकार्य केलं यापुढे असं सहकार्य करा कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता सूचना केल्या