तहसीलदार श्रीधर पाटील आणि पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना देण्यात आले निवेदन..
सावंतवाडी,दि.०६ : सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सावंतवाडी शहरात बुधवार दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील आणि पोलिस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पुंडलिक दळवी, दिगंबर नाईक, विशाल सावंत, अभिषेक सावंत,सोनू दळवी, आनंद धोंड, रामचंद्र मुळीक, उल्हास मुळीक, आकाश मिसाळ,भिवसेन मुळीक व मान्यवर उपस्थित होते.
सावंतवाडी शहरात मोटरसायकल रॅली काढून मराठा समाज बांधव तहसीलदार यांना निवेदन देणार आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या सर्वांना उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले आहे.