सावंतवाडी दि.०६: मराठा समाज नेते जरांगे पाटील यांना पाठिंबा देतानाच मराठा समाज बांधवांनी आरक्षणासाठी बुधवारी मोटरसायकल रॅली मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला पाहिजे, असे आवाहन जेष्ठ नेते विकास सावंत यांनी केले तर गाव तेथे मराठा समाज शाखा निर्माण झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करूयात असे सिताराम गावडे यांनी सांगितले.
सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे त्याबद्दल नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, जेष्ठ नेते विकास सावंत, अशोक दळवी,सौ अर्चना घारे,पुंडलिक दळवी, अभिषेक सावंत, विलास जाधव, सुर्यकांत राऊळ, दत्ताराम सावंत, चंद्रकांत राणे, सौ अपर्णा कोठावळे, सुमंगल कालेलकर, आबा सावंत, संजय लाड, भरत गावडे, अभिलाष देसाई, आकाश मिशाळ, विनायक सावंत, भारती मोरे, सतीश बागवे, संदेश परब, सिध्दांत परब,अजय सावंत, दिपक शिर्के, शिवदत्त घोगळे, निलिमा चलवाडी, सुभाष राऊळ, नारायण राणे, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, संजय कानसे, सुरेश गावडे, गुणाजी गावडे, उमेश गावकर, दिगंबर नाईक, प्रमोद सावंत, परशुराम चलवाडी,सौ सुप्रिया धारणकर, वैभव परब, मंथन गवस, संदीप माळकर,अमर धोंड, प्रसाद राऊळ, अभिजीत टिळवे आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरात मोटरसायकल रॅली बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालय ,मोती तलावाच्या सभोवताली फेरीत मारण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या बुधवार दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता राजवाडा येथून रॅली निघणार आहे.
श्री. गावडे म्हणाले, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी राजकीय कवचकुंडले बाजूला ठेवून,मन – मत भेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन रॅली यशस्वी करायची आहे असे या बैठकीत ठरले.