मनसैनिक सुधिर राऊळ आणि राकेश परब यांचा पुढाकार..
सावंतवाडी,दि.०४: महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मळगाव ब्राम्हणआळी येथे सोलर लाईटचे लोकार्पण करण्यात आले.
दरम्यान सोलर पॅनल स्ट्रीट लाईट चे उद्घाटन मनसे जिल्हा संघटक ॲड.अनिल केसरकर आणि राजू राऊळ, गौरेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी लाॅटरीसेनेचे तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर यांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या.या सोलर लाईट मुळे तेथील ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. येथील वस्ती ही जंगल पट्टयात असल्याकारणाने तेथून ये – जा करण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. मात्र आता त्या ठिकाणी मनसेने सोनार पॅनल लावले असल्याने बाजूला असणारी गणेश तळी आणि पाणी पिण्याची विहीर यासाठी तेथील ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने सोलर लाईटचा उपयोग होणार आहे.
ही सोलर लाईट दिल्याबद्दल ग्रामस्थांनी गणेश कदम आणि तेथील मनसैनिकांचे आभार मानले .
यावेळी महाराष्ट्र सैनिक साहिल तळकटकर, ओमकार नवार, संदीप राऊळ, जय राऊळ, अर्जुन गावकर मकरंद राऊळ गजेंद्र राऊळ अनिल राऊळ अनिता राऊळ गजानन राऊळ सुहासिनी राऊळ राखी राऊळ इत्यादि उपस्थित होते.