Site icon Kokandarshan

अमृत महाआवास अभियान पुरस्कार सन २०२२-२०२३ मध्ये सावंतवाडी तालुकास्तरावर ग्रामपंचायत निगुडे प्रथम क्रमांक..

सावंतवाडी,दि.२८: प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन २०२३-२०२४ च्या अंतर्गत तालुकास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत तसेच उत्कृष्ट घरकुलांना देण्यात येणारा पुरस्कार सोहळा दिनांक २७/१०/२०२३ रोजी सावंतवाडी नगरपरिषद सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. सन २०२२-२०२३ प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत निगुडे ग्रामपंचायत सावंतवाडी तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांकाला आली असून माजी सरपंच समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे तत्कालीन ग्रामसेविका श्रीम. तन्वी गवस व ग्रामपंचायत सदस्य आदींनी मेहनत घेऊन सदर योजना परिपूर्ण राबवली. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात प्रथम येण्याचा मान ग्रामपंचायततीला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो असे माजी सरपंच समीर गावडे यांनी म्हटले.

पाच वर्ष कार्यकाल पूर्ण करत असताना आपणास अनेक अडचणी आल्या या अडचणींवर मात करून गावाचा विकास करण्यावर जास्तीत जास्त भर दिला. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची घरे लाभार्थ्यांना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वाळू उपलब्ध होत नसताना उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज याची कुठेतरी पोच पावती मिळाली असं म्हणावं लागेल. गावाच्या विकासासाठी सरपंचांचं योगदान जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं सचिव म्हणून ग्रामसेवक यांनी परिपूर्ण प्रस्ताव योग्य वेळेत सादर केले. तसेच माननीय गटविकास अधिकारी श्री. व्ही. एम. नाईक, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी या सर्वांचे सहकार्य आम्हाला लाभले त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार माजी उपसरपंच गुरुदास गवंडे व माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी यांनी मला पूर्णपणे पाच वर्षे साथ दिली कुठेही राजकारण न करता म्हणून या पुरस्काराचे तेही मानकरी आहेत त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद असे गौरव उदगार माजी सरपंच समीर गावडे यांनी काढले.

Exit mobile version