५ नोव्हेंबर पासून प्रत्येक गावात जनसंपर्क अभियान राबवणार
सावंतवाडी,दि.२८: मराठा आरक्षण हे मनोज जरांगे पाटील यांची शेवटची आरपारची लढाई आहे,यासाठी प्रत्येक मराठ्यांनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे,राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळी भूमिका घेत असले तरी सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देणे गरजेचे आहे, तालुक्यातील मराठा समाजातील प्रत्येक बांधवाने आपल्या गावात संघटीत पणे ग्रामपंचायत कार्यालया समोर एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन सावंतवाडी मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ५ नोव्हेंबर पासून जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, या अभियानात प्रत्येक गावामध्ये भेट देऊन मराठा समाजाला आरक्षणाबाबतची माहिती व गरज पटवून देण्यात येणार आहे, त्यासाठी आपल्या गावातील मराठा बांधवांना संघटित करून त्याबाबतची तारीख ८४८४८२७९९३ या मोबाईल नंबर वर कळवावी असे आवाहन सीताराम गावडे यांनी केले आहे.