Site icon Kokandarshan

शिक्षिका प्रणिती बाबुराव सावंत यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या आदर्श पुरस्काराने सन्मानित..

सावंतवाडी,दि.२५: राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे संस्थापक व अध्यक्ष श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले यांच्या विद्यमाने देण्यात येणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार यावर्षी ४नंबर शाळेच्या शिक्षिका श्रीमती प्रणिती बाबुराव सावंत यांना प्रदान करण्यात आला.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ येथे सरस्वती पूजन, स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी हा पुरस्कार देण्यात आला.

श्रीमती प्रणिती बाबुराव सावंत यांचा विद्यार्थ्यांबद्दल चा जिव्हाळा, आपुलकी आणि सतत काम करण्याची इच्छाशक्ती तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली विद्यार्थ्यांबद्दलची त्यांची तळमळ पाहता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
तसेच याप्रसंगी कु. विष्णू नामदेव गुरव, सावंतवाडी नं. ४ आणि कु. शिवम शरद लाड, अंगणवाडी या दोन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी तर कु. तेजस्वी शैलेंद्र सगम, सावंतवाडी नं. ४ व कु. गिरीजा परशुराम तुंबगी, अंगणवाडी,यांना आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय जुडो कराटे स्पर्धा, सांगली येथे कुमारी काव्या अमित तळवणेकर हिने सिल्वर मेडल मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे आणि कु. कृष्णप्रिया सुधीर भंडारे हिने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक पटकावून शाळेची दरवर्षीची शिष्यवृत्तीची परंपरा कायम ठेवत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडून या दोघींनाही पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सिंधुदुर्ग शाखेचे अध्यक्ष सन्माननीय संतोष तळवणेकर तसेच सावंतवाडी नंबर चार च्या माजी शिक्षिका आणि दानशूर व्यक्तिमत्व कविता कमलाकर धुरी यांच्या हस्ते या मानाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला विलास सावंत,विचारे,महेश पांचाळ,शाळा व्य. कमिटीचे उपाध्यक्ष,श्रीम. गुंजन गावडे, शाळा व्य.कमिटीचे सदस्य, श्रीम. अस्मिता तळवणेकर, श्रीम. संचिता गावडे,आरती जाधव,वेदा गावडे,रूपाली गावडे,माजी उच्चश्रेणी मुख्याध्यापक कल्याण कदम,शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक.ध्रुवसिंग पावरा,लक्ष्मी धारगळकर, प्रणिती सावंत,अंजना पवार, सुजता पवार,राजेंद्र पित्रे,अन्वी धोंड,दिप्ती सोनवणे,सरिता भिसे,अक्षता कुडतकर, आदी मान्यवर उपस्थित.

Exit mobile version