सावंतवाडी,दि.२२: भाजपा युवा मोर्चाचे नवनिर्वाचित राज्य उपाध्यक्ष विशाल परब आज सावंतवाडी दाखल झाल्यानंतर त्यांचे येथील गवळीतिठा परिसरात ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
यावेळी परब यांनी बोलतांना मला पक्षाने दिलेली जबाबदारी आणि टाकलेला विश्वास मी नक्कीच सार्थकी लावीन,संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करीन, असा विश्वास यावेळी परब यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रभाकर परब, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, आनंद नेवगी,आदी कार्यकर्ते व विशाल परब मित्रमंडळ उपस्थित होते.