सावंतवाडी,दि.२१ : तालुक्यातील प्रमुख रस्ते तसेच राष्ट्रीय महामार्गावर खड्डयाचे प्रमाण वाढले आहेत. गणपती नंतर तातडीने हे खड्डे भरण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते मात्र अद्याप खड्ड्याचा प्रश्न जैसे थेच आहे त्यामुळे मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी येत्या ३० आक्टोबरं रोजी डब्बे वाजवा आंदोलन छेडणार आहेत असा ईशारा मनसे शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर
मनसे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या सह पदाधिकाऱ्यांच्यां शिष्टमंडळाने गणपतीपूर्वी भेट घेतली होती त्यावेळी आपल्या विभागातील रस्त्याना पडलेल्या खड्याबाबत विस्तृत व गांभिर्याने कल्पना देण्यात आली होती.
त्यानंतर डबक्यामध्ये गोणीतून डाबंर मिश्रीत खडीने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे त्याचप्रमाणे डी. एल. पी. मध्ये असलेले रस्ते त्यां त्यां ठेकेदाराकडून तातडीने भरून घेण्यात येतील आश्वासन कार्यकारी अभियंता श्री केणी यांनी दिले होते. आंबोलीतून जाणाऱ्या राज्य मार्गाचे काम केल्यानंतर काही दिवसातच रस्त्यावर खड्डे पडले होते वं ते काम त्वरित हाती घेण्यात येईल. या विभागातील प्रमुख रस्ते असणारे खड्डे गणपतीपूर्वी भरण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले होते. मनसे कडून मांडण्यात आलेल्या विषयांचा निपटारां झालेला नसून रस्त्यावरील खड्डे जैसे थेच आहेत. हे सर्व मांडलेले विषय अद्याप प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे सर्व भागातील रस्तेवर अजून खड्डे पडून त्यांची वाट लागलेली आहे. या समस्येमुळे सर्व नागरीक त्रस्त झाले आहेत व खड्ड्यामुळे अनेकवेळा अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
कित्येक नागरीकाना जीव गमवावे लागले आहेत तर काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. कल्पना देऊन देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात मनसे तर्फे ३० आक्टोबर रोजी कार्यालयासमोर डब्बे वाजवा आंदोलन छेडण्यात येणार आहे. मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डबे वाजवा आंदोलन करण्यात येणार असा ईशारा मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला आहे.