Site icon Kokandarshan

खासदार सुप्रिया सुळे २७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर..

सिंधुदुर्ग,दि.१८: येत्या २७ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे येणार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक घेणार आहेत. महाविकास आघाडी कोकणात भाजप व शिवसेनेला रोखण्याच्यादृष्टीने आतापासूनच तयारी करीत आहे. त्यासाठी विशेष करून राष्ट्रवादी कॉंग्रेस व ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दौरा करून मेळावाही घेतला होता. त्यानंतर आता अवघ्या पंधरा दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

Exit mobile version