सावंतवाडी,दि.१७ : आंबेगाव येथील श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिरात सुरु झालेल्या नवरात्र घटस्थापना उत्सव आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या सांमुदायिक पारायणाचा शुभारंभ आज भाजपा नेते युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्री परब यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान परब यांनी बोलतांना आंबेगाव गावातील ग्रामस्थांनी माझा केलेला सत्कार लाख मोलाचा असून गावच्या वतीने मला कधीही हाक द्या मी नेहमीच हजर राहीन अशी ग्वाही यावेळी दिली.

