Site icon Kokandarshan

नेमळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन…

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे आयोजन..

सावंतवाडी,दि.१६: सिंधुदुर्ग पोलीस दल पोलिस जनता संवाद, सायबर सुरक्षा उपक्रमांतर्गत सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत नेमळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथील ८ वी ते १२ वीच्या सुमारे १६० विद्यार्थी मुला मुलींशी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते व महिला पोलिस कॉन्स्टेबल५३३/गौरी ताम्हणेकर यांनी संवाद साधला, यादरम्यान सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन केले.

पोलीस उप निरीक्षक श्री अमित गोते यांनी
सायबर सुरक्षा अंतर्गत –
सोशल मीडिया- ई मेल पासवर्ड, सुरक्षित मेसेजिंग ॲप्लिकेशन,सुरक्षित वेब साईट असे विविध विषयावर माहिती दिली त्यामध्ये

सेक्युरिटी डेटा प्रायव्हसी प्रायव्हसी डेटा शेअरिंग आयडेंटिटी हॅकिंग अकाउंट क्लोनिंग यासंदर्भात सुरक्षा व वाढते धोके यावर उपाययोजना.
पोर्नोग्रफी ब्लॅकमेल,सेक्सटोर्शन

ऑनलाइन आर्थिक फसवणूक –
गुगल पे, फोन पे,पेटीएम ऑनलाईन वॉलेट अर्बन बँक तनिष्क ज्वेलर्स विविध शासकीय संस्था बँका यांच्या नावाने होणारे फ्रॉड त्याचे प्रकार यावर सुरक्षा बाबत उपाय व स्वतःची जबाबदारी

ई-मेल व मेसेजिंग ॲप –
ओटीपी फिशिंग लिंक क्लोनिंग ॲप यामधून फसवणूक याबाबत सुरक्षा

डार्क नेट-
ह्यूमन ट्राफिकिंग,अवयव विक्री, मनी लाँडरींग दहशतवादी कारवाया सतर्कता आपले कर्तव्य व सुरक्षा.

ऑनलाइन प्रसार व्यसने –
तंबाखू,गांजा,ड्रग्स, अमल्ली पदार्थ, तस्करी गुन्हेगारी, शरीरावर आणि मनोव्यापारावर परिणाम, देशविघातक कृत्ये,दहशतवाद फांडींग. वाढत्या हृदयविकार आणि स्ट्रोक समस्या. लागत पासून बचाव, धोके व उपाय.खबरदारी.
यापासून वाढत्या वयात विचार नियंत्रण.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये –
देशविघातक चित्रफिती वायरल करणे, भ्रमित करणे, अफवा पसरून वाईट उद्दिष्ट साध्य करणे,
तंत्रज्ञानातील स्थान आणि ते अजून घेण्याची दृष्टी व्यापक कशी असावी जेणेकरून देशाची एकत्मता अखंड राहील, गैरसमज होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही तसेच सायबर गुन्हे संपर्क व निवारण आणि त्यावर प्रथम उपचार –
यामध्ये डायल ११२ प्रणाली, शासनाची अधिकृत तक्रार वेब साईट, पोलिसांचा कार्यभाग, मदत कार्यवाही. स्वतःचे कर्तव्य आणि ज्ञानाचा प्रसार याविषयी मार्गदर्शन केले.

तर महिला पोलिस कॉन्स्टेबल गौरी ताम्हनेकर यांनी
महिला सुरक्षा –
Pocso पोस्को व महिला करिता कायदेशीर सुरक्षा बाबी, आपले कर्तव्य, मुलींची छेडखानी परिणाम, हार्मोन चेंज दरम्यान वाईट विचारावर कंट्रोल.

ध्येयाचे महत्व –
व्यायाम, अभ्यास, व्यक्तिमत्त्व विकास स्वतःची जबाबदारी स्वच्छता, कर्तव्य, देशाभिमान,एकात्मता, याविषयी माहिती पोलीस उपनिरीक्षक अमित गोते आणि पोलीस कॉन्स्टेबल गौरी ताम्हणेकर यांनी समजावून दिली.
यावेळी महेंद्र अकॅडमी येथील महेंद्र पेडणेकर, पोलीस हवलदार श्री निरवडेकर, प्राचार्य नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे येथील प्राचार्य श्रीमती बोवलेकर आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाला मुलांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.

सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीमती गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांनी आदेशित केले प्रमाणे सायबर सुरक्षा सप्ताह अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.

Exit mobile version