Site icon Kokandarshan

कोनाळ ग्रामपंचायत ते श्री देवी खंडेराय भवानी माता मंदिर पर्यंत घटस्थापना दिवसांपासून दसऱ्या पर्यंत दुर्गामाता दौड..

दोडामार्ग,दि.१५ : कोनाळ ग्रामपंचायत ते श्री देवी खंडेराय भवानी माता मंदिर पर्यंत घटस्थापना दिवसांपासून दसऱ्या पर्यंत दुर्गामाता दौड दररोज सकाळी ७ वाजता काढण्याचा निर्धार कोनाळ गावातील युवा वर्गाने केला आहे. आजपासून दुर्गामाता दौड सुरू झाली.

श्री खंडेराय भवानी मंदिर मध्ये घटस्थापना करण्यात आली आहे.गावात घटस्थापना १५ ऑक्टोंबर,ते, विजया दशमी,( दसरा ) २४ ऑक्टोबर पर्यंत दररोज सकाळी ७ वाजता श्री दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे.

सर्व ग्रामस्थांनी, स्त्रियांनी या दुर्गामाता दौड मध्ये सामील होऊन आपले धर्मकार्य म्हणून सकाळी ठीक ७ वाजता ग्रामपंचायत कोनाळ येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुर्गामाता दौड निघण्याचे ठिकाण ग्रामपंचायत कोनाळ ते श्री देवी भवानी देवी मंदिर कोनाळ असे आहे.

Exit mobile version